तुम्हीं 13 ते 19 या वयोगटातील आहात का?
तुमची मनःशांती ढळली आहे असं तुम्हांला वाटतंय का??
तुमचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास व्हावा असं तुम्हांला वाटतंय का??
या तिन्ही प्रश्नांची उत्तरं हो अशी असतील तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे.
नमस्कार मी उचिता थोरवत-संत(Uc) युवा यश मार्गदर्शक आणि युवा स्पंदन ची निर्मिती मला येत्या 3 वर्षांत महाराष्ट्र व कर्नाटक मधील 10000 किशोरवयीन मुलांना त्यांच्या आयुष्याच्या सर्वांगिण विकासासाठी शारीरिक, मानसिक, भावनिक व सामाजिकदृष्टया सक्षम बनवणे हा माझा ध्यास आहे.
चिमणीच्या पिल्लाला नुकतेच पंख फुटले की, त्याला वाटायला लागतं मी आता उडू शकतो. घरट्या बाहेर पडू शकतो, आकाशात उंच भरारी घेवू शकतो. अगदी तसंच असतं किशोरवयीन मुलांचं. हे वय असतं नविन आकार घेण्याचं, नविन घडणीच. बालपण आणि तारुण्य यांच्या मधला हा काळ. या वयात खूप सारे बदल होतात. वागण्या-बोलण्यात बदल होतात. विचार करण्याची पद्धत बदलते. बोलण्यात बदल होतात. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. एवढंच नाही तर त्यांना तेच बरोबर आहे असं वाटतं जे ते विचार करतात, बघतात आणि वागतात.
आजच्या या ब्लॉग मध्ये मी तुम्हांला अशा काही टिप्स सांगणार आहे, ज्या किशोरांसाठी तर उपयोगी आहेच पण त्यांच्या पालकांसाठी जाणून घेणं ही गरजेच्या आहेत, मग या 15 टिप्स काय आहेत हे जाणून घेण्यासाठी माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हांला नाही म्हणता यायला हवं. या वयात मुलं मुली आपल्या मैत्रीमध्ये प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतात. मैत्री म्हणजे सर्वकाही असतं आणि ही मैत्री निभावण्याच्या नादात नाही म्हणत नाहीत आणि मग पश्चाताप करतात. ते विचार करतात आपण नाही म्हंटल तर आपल्या मित्राला ते आवडणार नाही, तो नाराज होईल, त्याला आपला अपमान झाल्यासारखं वाटेल. त्याने माझ्याशी बोलणं बंद केलं तर? त्याला वाईट वाटलं तर? पण तुम्हीं असा विचार करू नका, कारण कोणत्याही नात्याचा पाया असतो विश्वास, एकमेकांना समजून घेणं. तुमच्या नकार देण्यानं तुमचा एखादा मित्र नाराज होत असेल, तो रागवत असेल तर अशा मित्रापासून दूर रहा. असं म्हणतात एक नासका आंबा सगळे आंबे खराब करून टाकतो, पण चांगले दहा आंबे त्या नासक्या आंब्याला निट नाही करू शकत. त्यामुळे मैत्री खूप विचारपूर्वक करा. तुमच्या ग्रुप मध्यें असा एखादा मित्र असेल तर वेळीच सावध व्हा.
किशोरवय हे जडणघडणीचं वय असतं. या वयात तुम्हीं अभ्यासात लक्ष दिलंत, नवं-नविन गोष्टी शिकलात, तर ते ज्ञान आयुष्यभर तुमच्या सोबत राहिल, आयुष्यभर ते ज्ञान उपयोगी पडेल. वेगवेगळी प्रेरणादायी पुस्तकं वाचा, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांना आवर्जून जा. पण बऱ्याच वेळेला मुलं प्रेम वैगेरे च्या फंदात पडतात आणि अभ्यासवरच आपलं लक्ष काढून वेगळ्याच गोष्टींत स्वतःला गुंतवतात.
ते आपल्या बाह्य गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायला लागतात. मला माझ्या सगळ्या किशोरवयीन मित्रमैत्रिणींना सांगावसं वाटतं, हे प्रेम नसतं, हे फक्त आकर्षक असतं आणि हे या वयात स्वाभाविक आहे. प्रेम तेच असतं जे आपले आई-वडील आपल्यावर करतात. तुम्हांला मला एक महत्त्वाचा सल्ला द्यावासा वाटतो, तो म्हणजे प्रेम करायचंच असेल तर ते पुस्तकांवर करा.
ते आपल्या बाह्य गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायला लागतात. मला माझ्या सगळ्या किशोरवयीन मित्रमैत्रिणींना सांगावसं वाटतं, हे प्रेम नसतं, हे फक्त आकर्षक असतं आणि हे या वयात स्वाभाविक आहे. प्रेम तेच असतं जे आपले आई-वडील आपल्यावर करतात. तुम्हांला मला एक महत्त्वाचा सल्ला द्यावासा वाटतो, तो म्हणजे प्रेम करायचंच असेल तर ते पुस्तकांवर करा.
स्वतःला थोडा वेळ द्या आणि स्वतःची आवड काय आहे ते शोध. कारण बऱ्याच वेळेला तुमचे इतर मित्र-मैत्रिणी करतात म्हणून तुम्हीं पण तेच करायला जाता. जसं की तुमच्या मित्राने कोचिंग चे क्लासेस लावले तर तुम्हीं ही लावता, पण काही दिवसांनी तुमच्या लक्षात येतं की, अरे मला तर हे आवडतच नाही, तुम्हांला त्याचा कंटाळा यायला लागतो आणि मग तुम्हीं ते अर्धवट सोडून देता. त्यामुळे जो पर्यंत तुम्हीं स्वतःची आवड शोधणार नाही, तोपर्यंत तुमची ही धर-सोड करायची सवय चालूच राहणार. हे बघू नका की ट्रेंड काय चालला आहे, काहीतरी असं करा की तुम्हीं कराल तो ट्रेंड बनेल.
तुम्हीं जर तुमच्या आयुष्याला आध्यात्माची जोड देवू शकला, तर मग सोन्याहून पिवळं. आध्यात्म तुम्हांला सकारात्मक तर बनवतेच पण त्यासोबत self councious पण बनवते. कोणतंही काम करण्यापूर्वी तुम्हीं विचार करू लागता, तुम्हीं काय करताय? का करताय? आणि ते करण्यामागे काय उद्देश आहे. प्रार्थनेचा ही आपल्या दैनंदिन जीवनात सामावेश करा.
तुम्हांला त्या गोष्टींना प्राधान्य देता यायला हवं ज्या करणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे. असं व्हायला नको की तुम्हीं कुणाच्यातरी प्रभावाखाली येवून काही गोष्टी करताय, तुम्हांला ठरवता यायला हवं की, सगळ्यात अगोदर कोणत्या गोष्टी ला प्राधान्य द्यायचं. उदा. समजा जर तुम्हांला एका लग्नाला जायचं आहे, पण त्याच दिवशी तुमची परीक्षा पण आहे. तर तुम्हांला ठरवता यायला हवं की यात सगळ्यात महत्त्वाचं काय.
तुम्हांला जो पॉकेटमनी मिळतो, त्याचं योग्य नियोजन करून खर्च करता यायला हवा. याचा फायदा तुम्हांला भविष्यात होईल. मोठे झाल्यावर तुम्हीं योग्य अर्थनियोजन करू शकाल व तुमची निर्णयक्षमता ही वाढेल.
सकाळ संध्याकाळ ध्यान करा. दैनंदिन कार्यात ध्यानाला महत्व द्या. आपल्या रोजच्या आयुष्यात काही नाही काही समस्या या असतातच. अभ्यासाचं टेन्शन, करियर च टेन्शन, रिझल्ट च टेन्शन. त्यामुळे रोज ध्यान करा, याने तुमचं मन तणावमुक्त राहील. तुम्हीं अगदी एक मिनिट पासून ही ध्यान करायला सुरू करू शकता व नंतर हळू हळू वेळ वाढवू शकता.
मित्रांनो या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं की स्वतःला ज्ञानाने सक्षम बनवुन, नाही म्हणायला शिकून स्वतःच्या कला जोपासायला शिकून स्वतःचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास कसा करू शकतो. पुढील भागामध्ये आपण उर्वरित ६ टिप्स बघू
मी तुम्हांला कितीही म्हंटल गुलाबजाम खूप गोड असतात तरी ते जोपर्यंत तुम्हीं खात नाही तोपर्यंत तुम्हांला ते समजणार नाही. ध्यान ही असंच काहीसं... त्यामुळे तुम्हीं ही ध्यान करा व याची अनुभूती घ्या.
मित्रांनो तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला? हा ब्लॉग तुम्हांला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेयर जरून करा, कदाचित तुमच्या एका शेअरिंग ने एखाद्याचं आयुष्य ही बदलू शकतं. तुम्हाला काही समस्या असतील किंव्हा तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट्स मध्ये जरूर विचारा. तसेच तुम्हीं माझी कम्युनिटी पण जॉईन करू शकता. कम्युनिटी जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. 👉🏼युवा स्पंदन
माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्या बद्दल आभार.🙏🏻









15 टिप्पण्या
छान आणि महत्त्वपूर्ण टिप्स आहेत याचा मुलांना नक्कीच फायदा होईल.
उत्तर द्याहटवाThank u tai
हटवाReally informative
उत्तर द्याहटवाThank you mam
हटवाआजच्या पिढीसाठी खूपच छान माहिती. खूप छान blog👌👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाThank you tai
हटवाछानच
उत्तर द्याहटवाThank u tai
हटवामाहितीपूर्ण लेख आहे खूप छान
उत्तर द्याहटवाThank you
हटवाApratim uchita ma'am
उत्तर द्याहटवाThank you
हटवाVery informative blog
उत्तर द्याहटवाKhoop chan information 👍
उत्तर द्याहटवाप्रत्येक किशोरवयीन मुलांनी या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत खूप छान
उत्तर द्याहटवाThank you for comments