तुमचं मुलं हल्ली खूप चिडचिड झालंय का?
तुमची मुलं हल्ली तुमचं काहीच ऐकत नाहीत का?
तुमची मुलं हल्ली त्यांच्याच कोशात राहत आहेत असं तुम्हांला वाटतंय का??
या तिन्ही प्रश्नांची उत्तरं जर हो असतील तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे.
नमस्कार, मी उचिता थोरवत संत. युवा यश मार्गदर्शक आणि युवा स्पंदन ची निर्माती. मला येत्या 3 वर्षात महाराष्ट्र व कर्नाटक मधील 10000 कुमारावस्थेतील मुलांना त्यांच्या आयुष्याच्या सुवर्णकाळासाठी शारीरिक, मानसिक, भावनिक व सामाजिकदृष्टया सक्षम बनवणं हा माझा ध्यास आहे.
काही दिवसांपूर्वी मला एका महिलेला फोन आला होता, तिची दोन्हीं मुलं किशोरवयीन होती आणि तिने माझ्यासमोर तक्रारींचा पाढाच वाचला आणि ती म्हणाली मला हे सगळं बदलायचं आहे, हल्ली माझ्या आणि मुलांच्या नात्यामध्ये जो तणाव आहे, तो मला घालवून मला माझं कुटुंब पुन्हां एकदा आनंदी बनवायचं आहे. हे असे विचार बऱ्याच पालकांच्या मनात येत असतात, पण यासाठी नेमकं काय करावं ते मात्र पालकांना समजत नाही. म्हणून च मी तुमच्यासाठी हा ब्लॉग घेवून आले आहे, हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा आणि तुमच्या मुलांसोबतच तुमचं नातं पुन्हां फुलवा.
1. मुलांवर विश्वास ठेवा:
खरं म्हणजे हे जग विश्वासावर टिकलेलं आहे. सर्व नातेसंबंध हे विश्वासावर टिकलेले असतात. जोपर्यंत आपण एखाद्यवर विश्वास ठेवतो, तोपर्यंत तो तुमचा विश्वासघात करणार नाही, पण आपणच संशयाच बिज रोवायला लागलो तर अविश्वासाची फळं त्याला आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुम्हीं तुमच्या मुलांवर पूर्णपणे विश्वास ठेवा. शेजारी-पाजारी कुठेही काही झालं तरी लगेच तुमच्या मुलांवर संशय घेवू नका, अविश्वास दाखवू नका. तुमचा त्यांच्यावरचा विश्वास तुमच्या बोलण्यातून, वागण्यातून व्यक्त होवू द्या. असं HHकेल्याने मुलं कोणतंही वाईट कृत्य करणार नाहीत व सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेयर करतील.
2. आपल्या मुलांच्या भावनांची काळजी घ्या:
या टप्प्यातून जाताना त्यांना कुणीतरी समजून घेणारं हवं असत. त्यांचे समवयस्क मित्रमैत्रिणी सेम फेज मधून जात असल्यामुळे मुलं त्यांच्या सोबत बोलताना कम्फर्टेबल असतात किंव्हा शिक्षक त्यांना सतत मार्गदर्शन करत असल्यामुळे काही शिक्षकांशीही ते मनमोकळं बोलू शकतात, पण हाच विश्वास जर पालकांनी मुलांमध्ये रुजवला, तर मुलं कोणत्याही दडपणाशिवाय पालकांशी बोलू शकतात, त्यामुळे तुमचं त्यांच्यासोबतच नातं अजून दृढ होईल.
3. प्रत्येक गोष्टीत मुलांना टोकू नका:
या वयात मुलांना स्वतःची अशी स्पेस हवी असते, लहान असताना ते आपल्या छोट्या-मोठ्या निर्णयांसाठी पालकांवर अवलंबून असतात, पण ही मुलं मोठी झाली की त्यांचे निर्णय त्यांना स्वतः घ्यायचे असतात आणि अशा वेळी तुम्हीं मुलांना टोकलेलं मुलांना आवडत नाही. ते चिडचिड करतात, आदळआपट करतात. त्यामुळे मूलांना त्यांचे निर्णय स्वतःच घेवू द्या, त्यांचा निर्णय चुकीचा असला तर चिडचिड न करता हळुवारपणे त्यांच्याशी बोला.
या वयात मुलांना पालकांशी बऱ्याच गोष्टी बोलायच्या असतात. या वयात होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांमुळे ती भांबावून गेलेली असतात. त्यांना बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेयर करायच्या असतात. त्यांना तुमच्या आधाराची गरज असते, नाहीतर ती भरकटत जातात. त्यामुळे तुम्हीं कितीही व्यस्त असला तरी मुलांशी बोलत रहा व त्यांचं बोलणं ऐकून घ्या.
बऱ्याच घरात पालक आणि मुलांमध्ये वाद हे एक तर संवाद नसल्यामुळे होतात किंव्हा चुकीच्या संवादामुळे होतात. पालकांना मुलांनी त्यांच्याशी सौजन्याने वागावं, बोलावं असं वाटत असतं, पण ते स्वतः मात्र मुलांशी तसं वागत नसतात. मुलांनी तुमच्याशी सौजन्याने व मैत्रीपूर्वक वागावं असं वाटत असेल तर तुम्हांलाही मुलांशी तसच वागावं लागेल.
या जगात कुणीही परफेक्ट नाही. प्रत्येकात काही ना काही कमतरता ही आहेच. त्यामुळे आपल्या मुलांची इतरांशी तुलना न करता त्यांच्यातील सकारात्मक बाबींचा शोध घ्या आणि त्याला जास्तीत जास्त विकसित करण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या छोट्या-छोट्या अचिव्हमेंट पण सेलिब्रिट करा. त्यामुळे मुलांना अधिकाधिक यश मिळवण्यासाठी प्रेरणा मिळेल व त्यांचा आत्मविश्वास ही वाढेल. मुलांमधील नकारात्मक बाबींचा कधीही चारचौघात उल्लेख करू नका. असं केलात तर तुमची मुलं तुमच्यापासून दुरवतील.
कौतुक कुणाला आवडत नाही. या वयातली मुलं तर स्वतःवर भलतीच खुश असतात, त्यांना स्वतःच कौतुक केलेलं आवडत असतं आणि अशा वेळी जर तुम्हीं मुलांचं कौतुक केलं तर ती तुमच्या अजून जवळ येतील. त्यांनी केलेल्या छोट्या मोठ्या कामाचं, त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं अगदी मनभरून कौतुक करा आणि मग जादू बघा ही मुलं तुमच्याशी कशी कनेक्ट होतात ती.
या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं, या टप्प्यातून आपण सर्वच जात असतो, या वयात जाणवणारा मानसिक हलकल्लोळ, भावनिक स्थित्यंतरे आपणही पाहिली आहेत, अनुभवली आहेत आणि या वयात आता आपली मुलं आहेत, त्यामुळे उगाच त्यांच्यावर चिडचिड करून नात्यात ताण आणण्यापेक्षा मुलांशी मैत्री करून त्यांची ही फेज सुकर बनवली पाहिजे, तरच मुलं आपल्याशी कनेक्ट होतील.
मित्रांनो तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला? हा ब्लॉग तुम्हांला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेयर जरून करा, कदाचित तुमच्या एका शेअरिंग ने एखाद्याचं आयुष्य ही बदलू शकतं. तुम्हाला काही समस्या असतील किंव्हा तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट्स मध्ये जरूर विचारा. तसेच तुम्हीं माझी कम्युनिटी पण जॉईन करू शकता. कम्युनिटी जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. 👉🏼युवा स्पंदन
माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्या बद्दल आभार.🙏🏻
13 टिप्पण्या
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाThank you
हटवाखूप छान
उत्तर द्याहटवाThank you
हटवाया लेखाच्या माध्यमातून किशोर वयीन मुलांना समजून घेणं पालकांना सोपं जाईल..
उत्तर द्याहटवाThank you
हटवाया लेखाच्या माध्यमातून किशोर वयीन मुलांना समजून घेणं पालकांना सोपं जाईल..
उत्तर द्याहटवाKhupach chhan writting and pictures..
उत्तर द्याहटवाउचिता images आणि शब्दांची मांडणी खूपच छान केली आहेस
उत्तर द्याहटवाThank you so much 🙏💐
हटवाThank you so much 🙏💐
उत्तर द्याहटवाNice guidance for parents👌👍
उत्तर द्याहटवाThank you for comments