तुम्हीं सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट काय करता?
हा काय प्रश्न आहे; अर्थातच, तुम्हीं तुमचा फोन तपासत असाल. ही सवय फक्त तुमचीच नाही, या जगात राहणारे बहुतेक लोक सकाळी हीच पहिली गोष्ट करतात. बरेच जण सकाळी उठल्या उठल्या सर्वप्रथम इंस्टाग्राम तपासतात. अभ्यास करताना, घरातील कामं करत असताना, ऑफिसमध्ये काम करत असतानाही आपल्या मनात हेच चालू असतं की ट्विटरवर काय ट्रेंड होत आहे? जेव्हा आपण बाहेर फिरायला जातो, तेव्हा आपण चांगला फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरुन आपण तो सोशल मीडियावर पोस्ट करून इतरांना जळवू शकू. स्नॅपचॅट आणि इंस्टाग्राम स्टोरीजशिवाय आपला दिवस जात नाही, कारण त्या आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनल्या आहेत.
नमस्कार, मी उचिता थोरवत. विद्यार्थी-पालक समुपदेशक, युवा यश मार्गदर्शक आणि युवा स्पंदन या प्लॅटफॉर्म ची निर्माती. येत्या तीन वर्षांत महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील १०००० किशोरवयीन मुलांना शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवणं हा माझा ध्यास आहे.
माझी भाची सध्या अकरावीत शिकतेय, ती इथे रहायला आली होती तेंव्हा मी तिचं निरीक्षण केलं, स्नॅपचॅट वर शेअर करण्यासाठी ती कधी कसला फोटो काढेल याचा नेम नव्हता. याबाबत विचारलं तर तिने दिलेलं उत्तर माझ्या डोक्यावरून गेलं. नेमकं स्नॅपचॅट काय प्रकार आहे हे समजून घेण्यासाठी मी ते माझ्या फोन मध्ये इन्स्टॉल केलं खरं, पण दुसऱ्या मिनिटाला माझ्या लक्षात आलं, हे काही आपल्याला कळणार नाही🤣
असो, सोशल मीडिया वाईट नाही कारण त्याने आपल्याला कोरोना आणि क्वारंटाईन दरम्यान खूप साथ दिली आहे. यामुळे आम्हांला आमच्या व्यावसायिक जीवनाचा पाठपुरावा करण्यात मदत झाली आहे, परंतु त्याचे अनेक दुष्परिणाम देखील आहे, ज्याचा थेट आपल्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. सोशल मीडियाचा दबाव तुम्हाला त्रास देत असेल किंवा तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करत असेल, तर तुम्हीं एक पाऊल मागे घ्या आणि तुम्हीं त्याचा कसा वापर करता ते तपासले पाहिजे. चला तर मग, आज मी तुम्हांला असे काही मार्ग सांगते, ज्याचा अवलंब करून तुम्हीं सोशल मीडियाचा दबाव कमी करू शकता आणि त्याचे सकारात्मक फायदे मिळवू शकता.
चला तर मग सुरुवात करूया,
१. कोणत्याही अपराधी भावनेशिवाय अनफॉलो करा.
तुम्ही सोशल मीडियावर कितीही मित्र, सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्तींना फॉलो करत असाल, पण जर कोणी तुमच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवत असेल, तर तुम्ही त्यांना अनफॉलो करण्यास पूर्णपणे मोकळे आहात. खोटे मित्र जे तुमच्यासाठी कधीही चांगले नव्हते पण तरीही तुमच्या सोशल मीडियावर आहेत, त्यांना अनफॉलो करायला हरकत नाही. तुमच्या नवीन जोडीदारासोबत स्वतःची छायाचित्रे पोस्ट करून तुम्हाला दुःखी किंवा अस्वस्थ करणाऱ्या तुमच्या ex ला अनफॉलो करा. तुमचा सोशल मीडिया अनुभव वाईट बनवतील अशा गोष्टींना बाजूला करणं केंव्हाही चांगलं.
२. आनंद देणारे फोटो पोस्ट करा:
तुमच्या सोबत असे कधी घडले आहे का की सोशल मीडियावर एखाद्याला फॉलो केल्यानंतर, त्यांनी पोस्ट केलेले चित्रविचित्र फोटो बघून तुमचं डोकं दुखायला लागलं? तुमचं स्वतःचं इन्स्टाग्राम किंवा फेसबुक बघून तुम्हांला स्वतःबद्दलच असं वाटलं तर काय?? त्यामुळे तुम्हांला खरोखर आनंद देणारे फोटो पोस्ट करा. जर तुम्हांला निसर्गावर प्रेम असेल तर ढग, आकाश आणि झाडांची छायाचित्रे पोस्ट करा. तुम्हीं तुमच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवला असल्यास, ते पोस्ट करा जेणेकरून तुम्हीं तुमचे प्रोफाईल जेंव्हा पहाल तेंव्हा, तुम्हांला तो दिवस आठवेल. तुम्हीं खरोखर आनंदी असताना तुमचे फोटो पोस्ट करा जेणेकरून तुम्हाला तुमचे आनंदाचे दिवस आठवतील.तुम्हीं ठरवलंत तर तुमचं सोशल मीडिया प्रोफाइल आनंदाच्या क्षणांनी भरले जाऊ शकते. याशिवाय, चांगल्या आठवणी साठवण्यासाठी हे ठिकाण म्हणून देखील वापरले जाऊ शकते, कारण सोशल मीडिया नेहमीच लाईक्स, कमेंट्स आणि फॉलोअर्ससाठी नसतो.
३. स्वतःची तुलना कोणाशीही करू नका:
सोशल मीडियाचं जग काहीसं खोटं आहे, कारण इथे लोकं जे दाखवतात ते खऱ्या आयुष्यात असतंच असं काही. त्यामुळे सोशल मीडियावरील इतर लोकांशी स्वत:ची तुलना करू नका कारण त्यावर पोस्ट केलेली छायाचित्रे ही एडिट केलेली, फिल्टर्स वापरलेली असतात. तसेच, लोक त्यांचे वाईट फोटो आणि दुःखाचे क्षण सोशल मीडियावर शेअर करत नाहीत. सामान्यतः आपण स्क्रीनवर जे पाहता ती लोकांची कृत्रिम प्रतिमा असते आणि वास्तविकता नसते. इथे बरेच लोक तुमची नक्कल करायला तयार असतात, जे तुम्हांला कदाचित आवडत नसतील, त्यामुळे जर तुम्हाला इतरांसारखे व्हायचे नसेल, तर त्यांच्याशी तुमची तुलना करणे थांबवा, कारण तुमच्या अनफिल्टर्ड व्यक्तिमत्वाची तुलना एखाद्याच्या एडीट केलेल्या प्रतिमेशी होऊ शकत नाही.
४. आनंद आणि प्रेरणा देणारी पृष्ठे (pages) फॉलो करा:
जे तुम्हाला निराश करते त जर तुम्हीं सोशल मीडियावर अनफॉलो केले आणि तुमचे सोशल मीडिया जीवन शक्य तितके आनंदी बनवण्याचा निर्धार केला, तर आता वेळ आली आहे ज्यामुळे तुम्हाला आनंद आणि प्रेरणा मिळेल अशा पेज ना फॉलो करायची. सोशल मीडिया वर असलेल्या चांगल्या प्रोफाइलना फॉलो करा. तुम्हांला वाचनाची आवड असेल तर कविता पेज किंवा प्रोफाइल फॉलो करा. तुम्हाला बरे वाटेल अशा कोणत्याही प्रोफाइला फॉलो करा. चांगल्या खाद्यपदार्थांच्या फोटोंपासून ते कॉमेडी व्हिडिओंपर्यंत, ही यादी खूप मोठी आहे. तुमचे सोशल मीडिया प्रोफाइल सकारात्मकतेने आणि तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टींनी भरले जाऊ शकते तर नकारात्मक गोष्टींवर वेळ वाया का घालवायचा.
५. ब्रेक घेणे आवश्यक आहे:
तुम्हाला माहीत आहे की तुम्ही सोशल मीडियावर नकारात्मक गोष्टी पाहायच्या नाहीत, पण काहीवेळा तुम्हाला इच्छा नसतानाही तसे करावे लागते. त्यामुळे गरज असताना सोशल मीडियापासून ब्रेक घेणेही गरजेचे आहे. जरी सोशल मीडिया तुमच्यासाठी सकारात्मकतेने भरलेला असेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करत असेल, तरीही तुम्हाला खऱ्या जगाशी कनेक्ट होण्यासाठी आणि थोडा वेळ एकट्याने घालवण्यासाठी थोडा वेळ त्यातून ब्रेक घेणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी आम्ही नेहमीच मनोरंजक कथा किंवा मजेदार मीम्सच्या शोधात असतो. यामुळे तुमचा मूड सुधारू शकतो, परंतु तरीही तुमचे मन इतरत्र लक्ष केंद्रित करण्यापासून प्रतिबंधित करते. म्हणूनच स्वत:ला आणि तुमच्या मनाला विश्रांती देण्यासाठी सोशल मीडियातून एकदातरी ब्रेक घेणे महत्त्वाचे आहे.
मित्रांनो, तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला? हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर like व comment जरूर करा आणि share करायला ही विसरू नका. तुमच्या एका शेअरिंग ने एखाद्याचं आयुष्य ही बदलू शकतं.
तुमचे काही प्रश्न असतील तर ते ही तुम्हीं मला विचारू शकता. किशोरवयीन मुलांचं समुपदेशन करायचं असल्यास माझ्याशी संपर्क साधू शक्यता. किशोरवयीन मुलांबाबत अजून मार्गदर्शनासाठी आजच माझी युवा स्पंदन ही कम्युनिटी जॉईन करा.
0 टिप्पण्या
Thank you for comments