तुमचं मुल 13 ते 19 या वयोगटातली आहे का?
तुमच्या मुलांच्या वाढत्या वयामुळे व बदलत्या स्वभावामुळे तुम्हाला अनेक प्रश्न पडतात का??
या दोन्ही प्रश्नांची उत्तरं हो असतील तर माझा हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे…
नमस्कार मी उचिता थोरवत-संत. युवा यश मार्गदर्शन आणि युवा स्पंदन निर्माती. मला येत्या तीन वर्षात महाराष्ट्र व कर्नाटक मधील 10000 मुलांना त्यांच्या आयुष्याच्या सुवर्ण काळासाठी शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवणे, हा माझा ध्यास आहे.
बालपण संपून तारुण्य सुरू होईपर्यंतच्या संक्रमण काळाला 'किशोरवय' म्हणतात. या वयात मुला-मुलींमध्ये अनेक शारीरिक व मानसिक बदल होतात. या होणाऱ्या बदलांमुळे मुलं थोडी गोंधळून जातात. हा आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा काळ असला तरीही मुलांसाठी तो आव्हानात्मक असतो. त्याच प्रमाणे पालकही खूप गोंधळून जातात. मुलांमध्ये झपाट्याने होणारे बदल पाहून पालकांची मनस्थिती ही संदिग्ध होते. मुलांशी नेमकं वागावं कसं? बोलावं कसं? असे अनेक प्रश्न पालकांना पडत असतात. अशावेळी किशोरवयीन मुलांबाबत असलेले गैरसमजही पालकांच्या डोक्यात गर्दी करायला लागतात. भले पालक या अवस्थेतून गेलेले असले, तरीही पालक या गैरसमजांना बळी पडतात. किशोरवयीन मुलं म्हटलं की उद्धट, हेकेखोर, लैंगिकदृष्ट्या सक्रिय, रागीट, आपल्याच कोशात असलेली मुलं, अशी काहीशी प्रतिमा आपल्या समोर उभी राहते. हे काही अंशी खरं असलं, तरीही सगळीच मुलं अशी वागतात /असतात असं नाही प्रत्येक मुलांमध्ये हे गुण कमी जास्त प्रमाणात आढळतात. आजच्या या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला असे ५ गैरसमज सांगणार आहे, त्यामुळे किशोरवयीन मुलांकडे बघण्याची आपली दृष्टी बदलते. हे 5 गैरसमज काय आहेत हे जाणून घेण्यासाठी माझा ब्लॉग शेवटपर्यंत जरूर वाचा.
किशोरवयाच्या सुरुवातीला मुला-मुलींच्या लैंगिक अवयवांच्या वाढीला सुरुवात होते आणि किशोरवय संपेपर्यंत ही वाढ पूर्ण होते. या वयात मुला-मुलींना या लैंगिक अवयवांबद्दल बरीचशी उत्सुकता वाटत असते, या अवयवांचा वापर करण्याबद्दलही उत्कट इच्छा मुलांमध्ये निर्माण होत असते. भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाटायला लागलेलं असतं. यामुळे काही मुलं-मुली हस्तमैथुन(Masturbation) च्या आहारी जातात. मुलींच्या तुलनेत मुलांचे प्रमाण याबाबत जास्त असलं तरीही आठवड्यातून एक ते दोन वेळा हस्तमैथुन करणे सामान्य आहे. पण तरीही सर्वच किशोरवयीन मुलं हे करतात, असा एक गैरसमज लोकांच्या मनात वाढीस लागला आहे. त्यामुळे पालक गोंधळलेले आहेत आणि मुलंही घाबरलेली आहेत.
किशोरवयीन मुलांबाबत हा अजून एक गैरसमज. मुलं किशोरवयात आली की आपल्याच कोषात रहायला लागतात, त्यामुळे कधीकधी ती थोडी बेजबाबदार वाटतात. पण पहायला गेलं तर तरुणांपेक्षाही किशोरवयीन मुलांमध्ये जबाबदारीची जाणीव जास्त असते. त्यांच्यावर एखादी जबाबदारी सोपवली तर ते ती उत्तमरित्या पार पाडतात. पण आपण मात्र उगाच त्यांच्या नावे हे शंख वाजवत बसतो.
किशोरवयीन मुलांना बऱ्याचदा अहंकारी मानले जाते पण हा त्यांचा दोष नसतो. हार्मोन्समधील बदल आणि मूड स्विंग यामुळे मुलं गोंधळतात आणि त्यामुळे ती थोडी उद्धट वागतात. घरचं वातावरण, शाळा इत्यादी मुळेही मुलं उद्धट वागतात. पण सगळीच मुलं उद्धट नसतात, त्यामुळे किशोरवयीन मुलं म्हणजे ते उद्धटच असणार, हा विचार खोडून काढणं गरजेचं आहे.
किशोरवयीन मुलांबाबत हा अजून एक गैरसमज. किशोरवयीन मुलं ही विकसनशील असतात. हे वय म्हणजे बाह्य जगाचा शोध घेण्याचं पहिलं पाऊल. या चंदेरी दुनियेत ते वाहवत जाण्याची ही शक्यता असते. त्यामुळे मुलांवर योग्य नियंत्रण ठेवणे आणि त्यांना व्यावहारिक विचार करण्यास प्रवृत्त करणे ही पालकांची जबाबदारी असते. त्यामुळे पालकांनी मुलांवर योग्य संस्कार केले तर मुलं नियंत्रणाबाहेर जात नाहीत.
जेंव्हा एखादं मुलं मोठं होऊ लागत तेंव्हा ते अनेक बदलांमधून जात असतं. किशोरांना असं वाटतं की तो/ती एकमेव हुशार व्यक्ती आहे व ती इतरांना शिकवू शकते, जे पालक या बदलाला प्रोत्साहन देतात त्यांना पुढे जाऊन अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण पालकांनी योग्य मार्गदर्शन केलं, संस्कार केले तर या गोष्टी होत नाहीत.
या 5 मुद्यांवरून आपण पाहिलं की सगळीच मुलं सारखी नसतात, त्यामुळे सर्वांना एकाच तराजूत तोलू नये. घरचं वातावरण, आजूबाजूचं वातावरण , शाळा, सोशल मीडिया यामुळे मुलांवर वेगवेगळे संस्कार घडत असतात, त्यांच्यावर परिणाम होत असतात आणि मग मुलं त्या प्रमाणे वागत असतात. त्यामुळे चुकीचे पूर्वग्रह बाळगून मुलांशी त्याप्रमाणे वर्तन करू नये.
मित्रांनो, तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला? हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर like व comment जरूर करा आणि shere करायला ही विसरू नका. तुमच्या एका शेअरिंग ने एखाद्याचं आयुष्य ही बदलू शकतं.
तुमचे काही प्रश्न असतील तर ते ही तुम्हीं मला विचारू शकता. त्याचप्रमाणे किशोरवयीन मुलांबाबत अधिक मार्गदर्शनासाठी माझी युवा स्पंदन ही community join करा.
माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मी आपली. आभारी आहे.
15 टिप्पण्या
खूपच सुंदर 👌
उत्तर द्याहटवाWonderful information
उत्तर द्याहटवाWill help to create a strong understanding relation
खूप सुंदर ब्लॉग प्रत्येक पालकांनी वाचला पाहिजे
उत्तर द्याहटवाउपयोगी आणि खूप छान माहिती दिली...
उत्तर द्याहटवाखुपच छान
उत्तर द्याहटवाअगदी खरे आहे
खुप उपयुक्त अशी माहिती......👍
खरंच अत्यंत उपयुक्त आणि प्रत्येकाला नक्कीच हवी असलेली माहीती
उत्तर द्याहटवाउचिता keep going and growing!!
Very usefull..Khup chan uchita
उत्तर द्याहटवाKhup upayogi mahiti👍👍
उत्तर द्याहटवाKhup Chan uchita, important ahe parents sathi
उत्तर द्याहटवाGreat blog
उत्तर द्याहटवाKhup chan upyukt mahiti...👍
Very nice presentation, keep it up. God bless you
उत्तर द्याहटवाI'm facing the situation 😂😂
उत्तर द्याहटवाKharch ya muddya var sarv parents ni vichar karayla pahije
उत्तर द्याहटवाखूप उपयुक्त माहिती
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवाThank you for comments