किशोरवयीन मुलांमध्ये आढळणारे मानसिक आजार व त्यावरील उपाय.

 



बालपण आणि किशोरवय हे वयाचे ते टप्पे आहेत, जिथे मुलांचा विकास खूप वेगाने होतो.  या काळात मुले शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप वेगाने बदलतात.  यातील काही बदल प्रत्येकामध्ये नैसर्गिकरित्या घडतात, तर काही बदल असे असतात जे आजूबाजूच्या वातावरणामुळे मुलांमध्ये दिसून येतात.

 आजच्या युगात लहान मुलांमध्येही शाळा, अभ्यास आणि बिघडलेले वातावरण यामुळे तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.  आजकाल अगदी लहान मुलांमध्येही आजूबाजूचे वातावरण, कुटुंबाची उदासीनता, भांडणं यामुळे मानसिक आजार दिसून येत आहेत.

ही अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे; कारण ज्या वयात मुलांनी खेळावे, उड्या माराव्यात आणि हसत-खेळत राहून काहीतरी नवीन शिकावे, त्या वयात मुले मानसिक समस्यांनी ग्रस्त होतात.  या समस्यांकडे लक्ष दिलं नाही आणि योग्य वेळी उपचार केले नाहीत तर मुलांना आयुष्यभर हा त्रास सहन करावा लागतो आणि त्यावर उपाय न मिळाल्याने ते इतर असामाजिक कृत्यांमध्ये गुंततात.  मुलांमध्ये वाढणाऱ्या मानसिक समस्यांबद्दल सर्व अधिक तपशीलवार पाहुयात.

नमस्कार, मी उचिता थोरवत. विद्यार्थी-पालक समुपदेशक, युवा यश मार्गदर्शक आणि युवा स्पंदन या प्लॅटफॉर्म ची निर्माती. येत्या तीन वर्षांत महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील १०००० किशोरवयीन मुलांना शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवणं हा माझा ध्यास आहे. 

 मुलाचे मानसिक आजार समजून घ्या व त्याचे भविष्य सुधारा.

● मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक:

           एका अभ्यासानुसार; असे आढळून आले आहे की, भारतात ५ कोटींहून अधिक मुले मानसिक समस्यांनी ग्रस्त आहेत.  ही संख्या सातत्याने वाढत आहे कारण आजपर्यंत मुलांच्या मानसिक आरोग्याबाबत कोणतीही मोठी पावले उचलली गेली नाहीत.  मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत.  किंबहुना, प्रौढांमध्‍ये दिसणार्‍या मानसिक समस्या हे लहानपणापासून चालत आलेल्‍या कोणत्या ना कोणत्या मानसिक समस्‍येचे वाढलेले रूप म्हणता येईल.

        मुले आणि किशोरवयीन मुलांवर परिणाम करणारे घटक म्हणजे त्यांचे कुटुंब, कुटुंबातील पालक-मुलाचे नाते, त्यांचे मित्र, मित्रांकडून त्यांच्यावर नियमित होणारा दबाव, अभ्यासात यशस्वी होण्यासाठीचा दबाव, टेक्नॉलॉजी चा जीवनात अति वापर आणि लैंगिक हिंसा हे होऊ शकते.

 काही मुलांना इतर मुलांपेक्षा जास्त मानसिक त्रास आणि एकटेपणा जाणवतो. याचे कारण असे असू शकते की ते स्वतःला इतर मुलांपेक्षा कोणत्या ना कोणत्या मार्गाने वेगळे वाटतात किंवा त्यांना तशी वागणूक मिळत असेल.  समाजाने बनवलेल्या नियमांनुसार म्हणा किंव्हा नमुन्यांवर मुले स्वत: ला शोधत नाहीत तेव्हा इतर लोकांच्या तुलनेत अनेकदा त्यांना वेगळे वाटते.  लैंगिकता, वर्ग, जात या आधारावर होणारा भेदभाव, कुटुंबातील हिंसाचार, वडीलधाऱ्यांचा पाठिंबा नसणे आणि पालकांकडून सतत लादण्यात येणारा दबाव हे प्रमुख घटक आहेत.

●मुलांना कोणत्या मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो?

अर्थात, प्रत्येक मूल एकमेकांपासून वेगळे असते आणि कोणत्याही मानसिक समस्येने ग्रस्त असू शकतात.  भारतातील राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणाच्या 2016 च्या अहवालानुसार, 13 ते 17 वर्षे वयोगटातील 7.3% मुले कोणत्या ना कोणत्या मानसिक समस्येतून जात आहेत.  ग्रामीण भागातील मुलांपेक्षा शहरी मुलांमध्ये मानसिक आजारांची समस्या अधिक असल्याचेही या अहवालात समोर आले आहे.  

मुलांमध्ये सामान्यतः या मानसिक समस्या दिसून येतात.

1. इटिंग डिसऑर्डर:

बर्‍याच प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की जेव्हा मुले तणावाखाली असतात तेंव्हा ते एकतर खूप खाऊ लागतात किंवा पूर्णपणे खाणे बंद करतात.  या प्रकारचा खाण्यापिण्याचा विकार मुलांपेक्षा मुलींमध्ये जास्त आढळतो.  हे बॉडी इमेज इशू मुळे देखील होऊ शकतं, जिथे मुलींना लहानपणापासूनच विशिष्ट प्रकारे दिसण्यासाठी दबाव आणला जातो.  इटिंग डिसऑर्डर अनेक प्रकारचे असतात.  जास्त खाणे किंवा जेवण वगळणे ही स्थिती अगदी किशोरवयापासूनच मुलांमध्ये दिसून येते. यापैकी बुलिमिया नर्वोसा आणि एनोरेक्सिया नर्वोसा या अतिशय सामान्य मानसिक आणि शारीरिक समस्या आहेत असे म्हणता येईल.

कित्येक तास भूक न लागणे, ही नक्कीच चिंतेची बाब असू शकते.

 2. पर्सनॅलिटी डिसऑर्डर:

अनेक मुलांमध्ये तारुण्याआधी म्हणजे किशोरवयातच, व्यक्तिमत्त्वाशी संबंधित काही लक्षणे दिसू लागतात. त्याचा जास्त राग येणे, भांडणे, चिडचिड होणे, मारामारी करणे याला पर्सनॅलिटी डिसऑर्डर लक्षणे म्हणतात.

 3. मूड डिसऑर्डर:

 ही अतिशय सामान्य मानसिक समस्या आहेत. ज्यात लहानपणापासूनच तणावामुळे मुलांचा मूड आणि वागणूक बदलते.  कधी कधी ते खूप दु:खी वाटतात आणि कधी कधी ते खूप हायपर ऍक्टिव वाटतात. नैराश्य, दुःख, राग आणि बायपोलर डिसऑर्डर हे मूड डिसऑर्डर आहेत जे मुलांमध्ये खूप सामान्यत: दिसून येतात.

4. एंझायटी डिसऑर्डर:

अनेक मुलांना सोशल इंजायटी असते, तर अनेकांना विविध प्रकारच्या भीतींनी वेढलेले असते.  किशोरवयात ही भीती फारशी उघडपणे समोर येत नाही, पण अभ्यास, करिअर किंवा कोणत्याही विशेष बाबतीत ही भीती उघडपणे मुलाच्या मनाला सामावून घेते.

5. नशा:

एडिक्शन वा व्यसन ही देखील एक मानसिक समस्या आहे. ज्यामुळे लहान वयातच लहान मुलं दारू, सिगारेट किंवा अंमली पदार्थांच्या आहारी जातात. या वयात त्यांची विचारशक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते आणि त्यामुळेच दारू आणि ड्रग्ज यांच्या ते पूर्णपणे आहारी जातात.

◆ मानसिक समस्यांशी झुंजत असलेल्या मुलांमध्ये ही लक्षणे दिसतात.


तुमच्या मुलाला कोणत्याही मानसिक समस्येने ग्रासले आहे की नाही हे जाणून घेणे आणि समजून घेणे खूप महत्वाचे आहे. हे शोधणे इतके अवघड नाही.  जर तुम्ही तुमच्या मुलाच्या लक्षणांवर आणि हालचालींवर बारीक नजर ठेवली तर तुम्हीं समजू शकता की तुमचे मूल संकटात आहे आणि त्याला मदतीची गरज आहे.

ही लक्षणे समजून घेतल्यावर, तुम्ही तुमच्या मुलाला समुपदेशकाकडे घेऊन जाऊ शकता, जिथे टॉक थेरपी किंवा इतर कोणत्याही प्रकारची मानसिक आरोग्य थेरपी मुलाला त्याच्या समस्येवर मात करण्यास मदत करू शकते.  तुमच्या मुलाच्या कोणत्या लक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे ते मी तुंम्हाला सांगते. जर ही लक्षणे तुमच्या मुलामध्ये दिसली तर तुम्हीं ताबडतोब तज्ञांशी संपर्क साधा.

 ● सतत खूप थकल्यासारखे वाटणे.

 ●खूप झोपणे किंवा अजिबात न झोपणे.

 ●भूक न लागणे.

●सर्व वेळ हताश वाटणे.

 ●एकाग्रतेचा अभाव.

 ●अपराधीपणाची भावना वाढणे.

 ●आत्महत्या करावीशी वाटणे. 

 ●चिंताग्रस्त वाटणे.

★ प्रतिबंध आणि उपचारमुलांचे मानसिक आरोग्य सुधारण्यात कुटुंबाचा मोठा वाटा असतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हांला समजले की तुमचे मूल काही कारणास्तव मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे, तर त्याच्यावर योग्य उपचार करणे खूप महत्वाचे आहे.

किशोरावस्था हा एक अतिशय कठीण काळ आहे आणि मानसिक समस्या ते आणखी आव्हानात्मक बनवू शकतात.  म्हणूनच कुटुंबाने आपल्या मुलाबद्दल खूप जागरूक असले पाहिजे आणि त्याला खूप प्रेम दिले पाहिजे.

जेव्हा एखाद्या मुलाला असे वाटते की आपल्याला कुटुंबाकडून प्रेम आणि आपलेपणा मिळत आहे, तेव्हा त्याला त्याच्या समस्यांना तोंड देण्याचे धैर्य मिळते.

जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचे मूल अभ्यासाच्या दबावाखाली चिरडले जात आहे आणि त्यामुळे त्याला/तिला सतत अस्वस्थता, भीती आणि निराशा वाटत असेल, तर त्याच्यावर/तिच्यावर अनावश्यक दबाव आणू नका.  प्रत्येक मुलाची क्षमता वेगवेगळ्या असतात.  जर तुमच्या मुलाला गणितात 100 पैकी 100 गुण मिळाले नाहीत तर तो आयुष्यात काहीच करू शकणार नाही असे नाही.  आजच्या युगात करिअरची कमतरता नाही.  मुलाला ज्या क्षेत्रात हवं असेल, त्या क्षेत्रात तो आपले नाव कमवू शकतो आणि पैसाही कमवू शकतो.  म्हणूनच त्याच्यावर डॉक्टर, इंजिनियर किंवा एमबीएचा दबाव आणू नका.

 घर हे प्रत्येकासाठी सुरक्षित  ठिकाण असले पाहिजे. तुमच्या मुलाला घरात असुरक्षित वाटत आहे का?  तसे असल्यास, त्याचे कारण शोधा.  तुमच्या मुलाला घरात असुरक्षित वाटणारी एखादी व्यक्ती किंवा घटना आहे का?  तसे असल्यास, त्या व्यक्ती किंवा घटना ताबडतोब दूर करा आणि आपल्या मुलासाठी एक चांगले आणि सुरक्षित घर तयार करा.

 जर तुमचे मूल मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असेल आणि व्यक्तिमत्व आणि मनःस्थितीशी संबंधित लक्षणे दिसत असतील तर त्याला बाल मानसशास्त्रज्ञ, थेरपिस्ट किंवा मानसिक आरोग्य समुपदेशकाकडे घेऊन जा.  ते एक्सपर्ट असतात जे डॉक्टरांप्रमाणेच तुमच्या मुलाची समस्या समजू शकतात आणि त्यांच्या अडचणी कमी करण्यास मदत करू शकतात.  तुमच्या मुलाला भरपूर प्रेम द्या आणि त्याला खात्री द्या की तो लवकरच बरा होईल. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा अवास्तव दबाव आणू नका. त्याच्याशी सतत बोलत राहा जेणेकरून त्याच्या मनात काही गोंधळ असेल तर तो तुम्हाला उघडपणे सांगू शकेल.

मित्रांनो, तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला? हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर like व  comment जरूर करा आणि share करायला ही विसरू नका. तुमच्या एका शेअरिंग ने एखाद्याचं  आयुष्य ही बदलू शकतं. 

         तुमचे काही प्रश्न असतील तर ते ही तुम्हीं मला विचारू शकता. किशोरवयीन मुलांचं समुपदेशन करायचं असल्यास माझ्याशी संपर्क साधू शक्यता. किशोरवयीन मुलांबाबत अजून मार्गदर्शनासाठी आजच माझी युवा स्पंदन ही कम्युनिटी जॉईन करा.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

Thank you for comments